शाहुवाडी पूरग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्या – श्री पुंडलिक जाधव ( मनसे )
शाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील पूर परिस्थितीची गंभीर दाखल घेवून पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून, त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुंडलिक जाधव यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, शाहुवाडी तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. यामध्ये शेती, संसारोपयोगी साहित्य, या सोबतच व्यापाऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. संबंधित परिस्थितीचे गांभीर्यपूर्वक पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून होत आहे.

यावेळी पुंडलिक जाधव, गजानन जाधव जिल्हाध्यक्ष, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, सहकार सेनेचे उपाध्यक्ष सतीश तांदळे, मोहन मालवणकर, आदींसह मनसे चे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मनसे च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येळाणे , मलकापूर येथील पूरग्रस्तांची भेट घेवून ,पुरामुळे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई त्वरित मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे युवराज काटकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे, प्रवीण कांबळे, अजय गुरव, रोहित जांभळे, यांच्यासह मनसे चे कार्यकर्ते उपस्थित होते.