शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते डॉ.संजय जगताप यांचा सन्मान..
शाहुवाडी प्रतिनिधी दि.१७
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या शाळेतील सर्व मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरू राहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत त्यामधील प्रत्येक शनिवार शिकू आनंदे (LEAR WITH FUN) पण या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय प्राथमिक शाळा माण ता.शाहुवाडी चे पदवीधर अध्यापक डॉ. संजय जगताप यांनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसह ससाहित्य कवायत उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ( ए.टी.एम) आयोजित पंढरपूर येथे दि.१५ रोजी संपन्न झालेल्या पाचव्या राष्ट्रीय शिक्षण संमेलनामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक मा. दिनकर टेमकर साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी एस सी ई आर टी पुणे उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे मॅडम ,सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार दिल्ली येथील मेंटॉर शिक्षिका मनु गुलाटी,केरळ येथील शिक्षणतज्ञ विधू नायर, राजस्थान येथील ॲप गुरु इम्रान खान,पंढरपूर गट शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे एटीएम राज्य संयोजक विक्रम अडसूळ, सहसंयोजक नारायण मंगलाराम, ज्योतीताई बेलवले,गडचिरोलीचे राष्ट्रीय आदर्श शिक्षक खुर्शिद शेख आदीं मान्यवर उपस्थित होते.