कोडोली त श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता. पन्हाळा येथील श्री कोटेश्वर मंदिरात शनिवार दि.२६ रोजी सकाळी शेगाव येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमांनी पार पडला.
श्री कोटेश्वर मंदिरात सकाळी श्रींच्या मूर्तींस अभिषेक झाल्यानतंर गजानन विजय ग्रंथाचे सकाळी ११ वाजता सामुदायिक पारायण सपंन्न झाले. ज्यांच्याकडे श्री गजानन विजय ग्रंथ उपलब्ध नव्हते, अशा भाविकांना ग्रंथाचे वाटप करण्यात आले. पारायणा नंतर सामुदायिक महाआरती कोडोली पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या हस्ते झालेनतंर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पारायणात सहभाग घेतलेल्यासह शेकडो भाविकांनी श्री च्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.
स.पो.नि.विकास जाधव,पोलीस कर्मचारी गोरक्षनाथ माळी यांना श्री गजानन विजय ग्रंथ, श्रीफळ भेट देवून दिलीप पाटील, राम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धोंडीराम कुंभार, दिपक जाधव, सुहास तोडकर, कृष्णात जाधव, माजी सरपंच भानुदास पाटील, डी.डी.पाटील यांच्या उपस्थितीत हा उत्सव सपंन्न झाला.