शिराळ्यात आरोग्य शिबिरात ३०४० रुग्णांची तपासणी -श्री विराज नाईक
शिराळा प्रतिनिधी(संतोष बांदिवडेकर) : आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा तालुक्यात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिर सुमारे ३ हजार ४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ही माहिती सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, आमदार मानसिंगभाऊंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. हे उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, मोफत वही वाटप, शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, विश्वास व विराज उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आदी उपक्रमांचा सहभाग होता. हे घेण्यामागे वाढदिवसाच्या औचित्याने समाजसेवा घडावी. त्याचा फायदा डोंगराळ, ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांना मिळावा, हा होता. आमदार नाईक लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, सार्वजनिक विकासासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकासकामे राबविली आहेत. राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून हा आरोग्य शिबिरांचा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ जून ते ४ जुलै अखेर आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये मणदूर, शिरसी, चरण, सागाव, टाकवे, मांगले व अंत्री बुदूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेण्यात आले. या शिबिरांत परिसरातील रुग्णांनी सहभाग नोंदविला. सर्व शिबिरात मिळून २०४०रुग्णांना लाभ घेतला. एकूण रुग्णांपैकी इ.सी.जी तपासणी ४९०तपासणी झाली. यापैकी १२२ टूडी इको, सी. ए. जी. या पुढील तपासणीसाठी निवड करण्यात आली. या तपासण्याही मोफत करण्यात येतील. सर्व शिबिरात मिळून ८८८जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यापैकी १४२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. ६३८ जणांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. ३६० जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
ते म्हणाले, आरोग्य सप्ताह यशस्वी करण्यासाठी स्वस्तिक हॉस्पिटल व सचिन हॉस्पिटल (कोल्हापूर), सेवा सदन हॉस्पिटल (सांगली), डॉ. रमेश पोरवाल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दृष्टी हॉस्पिटल व जयंत नेत्रालय (इस्लामपूर) ने मोलाचे सहकार्य केले. मानसिंगभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण भागात येवून आपल्या कुशल, तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासण्या केल्या. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पाटील, सर्व ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. नसीमा पटेकरी, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. गणेश राजमाने, डॉ. एम. एम. घड्याळे, डॉ. वासिम जमादार यांच्यासह ज्या त्या प्रा. आ. केंद्रातील सर्व सहकारी यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले. तपासलेल्या रुग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी निवड, शस्त्रक्रिया, नेत्रतपासणी, चष्मे, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड, एजोंग्राफी, एंजोप्लास्टी सारख्या करण्याची तयारी दर्शवली व रुग्णसेवा केली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत. ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान, ‘विश्वास‘ व ‘विराज‘ कारखान्याचा वैद्यकीय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल, विश्वास कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी विक्रमसिह गावडे यांनी कष्ट घेतले.