सामाजिक

…” शिवतेज ” च्या जिजाऊंची पाखंर हरपली !!!


बांबवडे :माणूस कितीही मोठा झाला, तरी आई हि त्याची दुखरी बाजू असते. कधी काळी प्रेमाने केसातून हात फिरवलेला असतो, तर कधी संस्कारांसाठी पाठीत धपाटा मारलेला असतो. पण आई , हि आईच असते. तिच्या नऊ वारी लुगड्याच्या पदराची ऊब कधी पैठणीला येणार नाही. असाच मायेचा पदर हलकाच हातातून निसटून गेला, तर, तर आवघं आकाश फाटतं. धरणी दुभंगते, आणि डोळ्यातील अश्रूंची त्सुनामी अवघ्या आयुष्याला विस्कटून टाकते. अशीच एक मुंबईची आई आपल्या लेकरांच्या हातातून, आपल्या लेकी, सुना, नातवंडांच्या हातातून आपला पदर अलगद सोडवून निघून गेली. हि दुर्दैवी घटना आहे बांबवडे येथील नारकर कुटुंबांची . बांबवडे चे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश शंकर नारकर यांच्या आईंचे आठ दिवसांपूर्वीच निधन झाले. नारकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या दु:खात साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज परिवार सहभागी आहे. दि.३१.ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे उत्तर कार्य आहे. या दिवशी आठवणींच्या समुद्राला उधान येणार आहे . आपल्याला जेव्हा समजू लागलं तेव्हापासूनचे सर्व प्रसंग हुबेहूब समोर उभे राहणार आहेत आणि पुन्हा एकदा डोळ्यांच्या कडांना त्सुनामीचा भास होणार आहे. अशा मुंबईच्या आईंच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण शब्दांजली.
मुळचे डोणोली इथं आजोळ असणारे नारकर कुटुंब वावरल, मोठ झालं, ते मात्र बांबवडे इथं. त्यामुळे मित्र परिवार बांबवडे इथं मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर चंद्रकांत नारकर व सुरेश नारकर या दोन्ही बंधूंनी आपल्या मधुर वाणीने आणि लोकांना सहकार्य करण्याच्या भावनेने गोळा केलेला गोतावळा, हा अवघ्या पंचक्रोशीत विखुरला आहे. परंतु या दोन्ही बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ती त्यांची आई. त्यामुळेच हि मंडळी सातत्याने सगळीकडे निर्धास्तपणे वावरत होती. त्यांचे झालेले संस्कार, त्यांच्या या मुलांमध्ये त्याचप्रमाणे नातवंडांमध्ये सुद्धा प्रतीत होत होतं. त्यांच्या आईंना सर्व जवळची मंडळी मात्र ” मुंबईची आई ” म्हणून बोलवत असंत. अशी मुंबई ची आई या कुटुंबाला सोडून गेली, आणि ‘ शिवतेज ‘ च तेजंच नाहीसं झालं. कारण त्या घराच्या एक आधार होत्या. मुलांच्यावर संस्कार करणाऱ्या जिजाऊ होत्या. म्हणूनच शिवतेज ला तेज आलं होतं. अशा जिजाऊ आकस्मिकपणे सोडून गेल्या, आणि शिवतेज हमसून , हमसून रडू लागला. कधीही त्यांच्या घरापर्यंत जाण्याची वेळ कुणावर आणू न देणारी भावंडं आज मात्र पोरकी झाली. नातवंडांची मायाळू आजी म्हणजेच मुंबई ची आई आपल्या नातवंडांना सोडून गेली होती. सुरेश बापू म्हणजे अनेक मंडळींचा आधार. आज तोच आधार निराधार झाल्यासारखे भासू लागले आहे. मुंबईच्या आई च्या आसपास फिरणारी मित्रमंडळी सुद्धा एकांतात अश्रू ढळत आहेत. हीच ती माया, हीच ती आपुलकी, आणि हाच तो जिव्हाळा.
पुनश्च मुंबईच्या आईंना विनम्र अभिवादन!!!

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!