गोकुळ चे१० लाख झाडांच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट -श्री विश्वास पाटील
बांबवडे : गतवर्षी कोल्हापूर जिल्हा दुध सहकारी संघाने ३ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, हेच उद्दिष्ट यंदा १० लाख वृक्षरोपणाचे ठरविले आहे. तेंव्हा गोकुळच्या सर्व शीतकरण केंद्र, दुध उत्पादक संस्था या सर्वांनी उत्स्फुर्तपणे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन देखील करावे, असे आवाहन गोकुळ चे अध्यक्ष श्री विश्वास पाटील (आबाजी ) यांनी केले आहे.
आज दि.१५ जून रोजी गोगवे तालुका शाहुवाडी येथील पाटणे रस्त्यावर असलेल्या गोकुळ च्या शीतकरण केंद्रात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री पाटील बोलत होते. शीतकरण केंद्राची कामाची जागा सोडता इतर ठिकाणी फळे,तसेच फुलझाडे लावण्यात आलेली आहेत. गेल्या १० वर्षांपासून या झाडांची निगा या शीतकरण केंद्राकडून राखली जात आहे.
आज झालेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात अध्यक्षांसह संचालकांच्या हस्तेही झाडे लावण्यात आली. यावेळी आंबा,फणस, आदि झाडांचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे इथं लावण्यात आलेली झाडे सेंद्रिय पद्धतीने जतन करण्यात येत आहेत.
यावेळी संचालिका सौ.अनुराधा ताई पाटील, संचालक विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, विराज शिंदे, गोकुळ चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, गोगवे शीतकरण केंद्र शाखाप्रमुख सुधाकर पाटील, सुभाष जामदार, अधिकारी वर्ग,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.