शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील – श्री रणवीरसिंग गायकवाड
बांबवडे : . शेतकरी हा सर्व अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानून गेली दोन वर्षे जिल्हा बँकेत आम्ही काम करीत आहोत. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी वि.का.स. सेवा संस्था गरजेच्या आहेत. त्या वाढविण्यासाठी आमचा सतत प्रयत्न असणार आहे. शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. असे मत कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक व उडत साखर कारखान्याचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी व्यक्त केले.
रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती संघटनेच्या वतीने नवीन वि.का.स. सेवा संस्थांना मंजुरी मिळाल्याने त्या संस्थांचे प्रमाणपत्र वाटप, आदर्श वि.का.स. सेवा संस्था, त्याचबरोबर आदर्श सचिव पुरस्कार यांचे वाटप उदय साखर चे संस्थापक चेअरमन मानसिंगराव गायकवाड तसेच प्रमुख पाहुणे माजी आमदार श्री सत्यजित पाटील सरुडकर यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा नुकताच संपन्न झाला.
यावेळी नव्याने मंजूर झालेल्या संस्थांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
१. मृणाल वि.का.स. सेवा संस्था, सोंडोली, २. स्वामी समर्थ वि.का.स. सेवा संस्था कोतोली, ३. सौ.शैलजादेवी गायकवाड वि.का.स. सेवा संस्था शिंपे, ४. भारतमाता वि.का.स. सेवा संस्था थेरगाव,५. धोपेश्वर वि.का.स. सेवा संस्था निळे, ६. पांडुरंग वि.का.स.सेवा संस्था करुंगळे या सहा वि.का.स. सेवा संस्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर तालुक्यातील आदर्श वि.का.स. सेवा संस्थांना आदर्श पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये १. आंबा वि.का. स. सेवा संस्था आंबा, २. श्री निनाईदेवी वि.का.स. सेवा संस्था करुंगळे,३. नामदेवराव खोत वि.का.स. सेवा संस्था कडवे, ४. जुगाईदेवी वि.का.स. सेवा संस्था येळवण जुगाई, ५. निनाईदेवी वि. का. स. सेवा संस्था येळाणे, ६. अरुण वि.का.स. सेवा संस्था वाडीचरण, ७. हनुमान वि.का.स. सेवा संस्था सरूड, ८. ज्योतिर्लिंग वि.का.स. सेवा संस्था भेडसगाव, ९. केदारलिंग वि.का.स. सेवा संस्था सोंडोली, १०. नांदगाव वि.कस. सेवा संस्था नांदगाव, ११. विठलाई वि.का.स. सेवा संस्था पेंडाखळे, या अकरा विकास सेवा संस्थांना आदर्श सेवा संस्था पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी आदर्श सचिव पुरस्कार देखील देण्यात आले.
१. श्री दिलीप खुटाळे वारूळ संस्था, २. श्री मारुती बापू जाधव करुंगळे, ३. रमेश राजाराम पाटील,४. विजय जयवंत कांबळे सावर्डे खुर्द, ५.बंडू नाना नलावडे, ६. दिनकर भोसले, ७. जयंत अनंत मराठे,८. भीमराव पाटील सोंडोली, ९. तुकाराम पाटील घुंगुर,१०. सुभाष राजाराम पाटील, करंजफेण,११. संदीप वांद्रे पाटील या वि.का.स. सेवा संस्थांच्या सचिवांना आदर्श पुरस्कार देण्यात आले.
यामागे होतकरू मंडळींच्या पाठीवर शाबासकीची थाप श्री मानसिंगराव गायकवाड दादा, व रणवीरसिंग गायकवाड सरकार यांनी दिली आहे.