शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावेत -श्री रामलिंग चव्हाण
बांबवडे ( अंकुश पाटील ): शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी स्वत:च्या नावाचे फार्मर आयडी काढून घ्यावेत.त्यामुळे शासनाने घोषित केलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाहुवाडी चे तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, सेवा संस्था सचिव, महा -ई सेवा केंद्र तसेच यासाठी होणाऱ्या कँप चा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. फार्मर आयडी द्वारे शासनाच्या सर्व योजनांचा आपल्याला लाभ होईल.जर आपण फार्मर आयडी काढला नाही,तर आपल्याला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.