महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये पद्ग्रहण समारंभ
कोडोली प्रतिनिधी:-
नवे पारगाव ता.हातकलगंले येथील महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट मध्ये पद्ग्रहण समारंभ उत्साहात साजरा झाला. या पद्ग्रहण समारंभाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कोरे यांच्या हस्ते दिपप्रजवलन करून करण्यात आली. महात्मा गांधी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ.शैलेश सुधाकर कोरे यांची महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी(I.R.I.A)संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार अॅड. वर्षाताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील पदाधिकारी यांचा पद्ग्रहण व विशिष्ट प्रख्यात मान्यवर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.शैलेश कोरे यांनी अध्यक्ष पदाची शपथ घेतली, व नवीन बोधचिन्हाचे लाँचिंग ही करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधाकर कोरे , दलित महिला विकास मंडळ प्रवर्तक अॅड. वर्षाताई देशपांडे, भारतीय रेडिओलॉजी संघटना माजी अध्यक्ष डॉ.जिग्नेश ठक्कर, कोल्हापूर जिल्हाचे शल्यचिकित्सक डॉ.एल.एस.पाटील, सहकार उद्योग समूह यळगुड माजी सचिव के.डी. धांवडे, सुराज्य फौंडेशन चे अध्यक्ष एन.एच.पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..