राजकीयसामाजिक

शेतकऱ्याच्या हक्कासाठी कर्णसिंह सरकार व राजर्षी शाहू आघाडी गरजेची : श्री रामचंद्र शिंदे सोनवडे


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सुमारे १० वर्षांपूर्वी सहकार कायद्याखाली नोंदणीकृत दुध संस्थेला अद्यापही गोकुळ दुध संघात सहभागी करून घेतलेले नाही. आणि हे केवळ गोकुळ मधील घाणेरड्या राजकारणाचे हे फलित आहे. असे व्यापारी सत्ताधारी बदलण्याची गरज आहे, या ठिकाणी कर्णसिंह गायकवाड सरकार यांच्यासारखे दुधाहूनहि निर्मळ असलेले सदस्य, या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणे, हि काळाची गरज आहे, असे सोनवडे येथील दुध संस्थेचे चेअरमन श्री रामचंद्र शिंदे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.


श्री शिंदे पुढे म्हणाले कि, संस्थेचे दुध सकस आणि स्वच्छ असूनही, येथील काही कारभाऱ्यांच्या आकसापोटी चुकीचे निर्णय घेतले जातात. केवळ राजकारण करून, ग्रामीण भागातील दुध संस्थेला वेठीस धरण्याचे प्रयत्न आमच्या या संस्थेबाबत केले गेले आहेत. तरीसुद्धा आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले व आमचे सर्व प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागात सुरु असलेली दुध संस्था म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची हक्काची छोटीशी बँक म्हणावयास हरकत नाही.


संस्था निर्माण करण्यासाठी किती कष्ट लागतात, ते कोणाला सांगण्याची गरज नाही. ग्रामीण भागातील सुरु झालेल्या संस्था वाढवणे, त्या जोपासणे हे खरे काम तेथील संचालकांचे असते. परंतु आमच्या सारख्या अनेक संस्थांना गोकुळ दुध संघात समाविष्ट करून घेण्यास आडकाठी घालणाऱ्या मंडळींबाबत काय बोलावे, आपला शेतकरी जपला पाहिजे, याचे साधे भान हि मंडळी विसरून गेली आहेत. दरम्यान पुन्हा सत्ताधारी निवडून आले, तर हा गोकुळ संघ मल्टीस्टेट केल्यावाचून हि मंडळी थांबणार नाहीत.


ग्रामीण भागातील शेतकरी पहाटेपासून वैरणीच्या तयारीला लागतो. सकाळी डोक्यावरून वैरणीचा भारा आणल्याशिवाय त्याला गत्यंतर नसते. आमच्या माताभगिनी सकाळी उठल्यापासून शेण घान काढून, दुध काढायला बसतात. आणि अशा कष्टाच्या कामांच्या नंतर दुधाचे दाम, त्या शेतकऱ्याला मिळत असतात. अशावेळी जर कोणी राजकारण करून संस्थेच्या दुध संघातील नोंदणीला, माझा तालुका आहे, मी बघतो, असे सांगून आडकाठी घालणार असेल,तर असले घाणेरडे राजकारण योग्य नाही. यासाठी शेतकऱ्याचा हक्काचा प्रतिनिधी तिथे असणे, हि काळाची गरज आहे. केवळ राजकारण करणारी मंडळी निवडून येवून त्याचा उपयोग नाही.


यासाठी कर्णसिंह गायकवाड,अमरसिंह पाटील भाऊ हे उमेदवार व त्यांचं राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनेल निवडून येणे ,हि काळाची गरज आहे. असे हि सोनवडेच्या खंडेराया दुध संस्थेचे चेअरमन रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!