श्री जनार्दन गुरव सरांची ओबीसी संघाच्या कोल्हापूर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
शाहुवाडी प्रतिनिधी :भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील श्री जनार्दन गुरव यांची अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

. संत गाडगे बाबा सांस्कृतिक हॉल , इचलकरंजी या ठिकाणी अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघ च्या पदाधिकारी निवडींची नियुक्ती पत्रे वाटप करण्याचा सोहळा संपन्न झाला. यावेळी गुरव सरांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

श्री जनार्दन गुरव यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन.

यावेळी संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व राज्य प्रवक्ते इम्तियाजअली शेख , महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्षा आकांक्षा कुंभार , राज्य कोअर कमिटी सदस्य शिवकुमार मुरतले, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष नदाफ आदी मान्यवरांच्या हस्ते श्री जनार्दन गुरव यांना संघाचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदाच्या निवडी चे पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष संजय सुतार, जिल्हा उपाध्यक्ष (शहर ) शेखर शिंदे, जिल्हा सचिव सतीश कुंभार, जिल्हा कोषाध्यक्ष लालचंद पारिक, जिल्हा संघटक सतीश लोहार, प्रसिद्धी प्रमुख राम आडके, संपर्क प्रमुख सचिन रामसिंग, जिल्हा सदस्य स्वप्नील पाटील, गजानन लवटे, नारायण गणबावले, भानुदास तासगावे, हनुमंत भागवत, महिला सदस्या अनिता माने, व पदाधिकारी यांच्यासह इचलकरंजी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.