सामाजिक

शिवसेनेच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त कोडोलीमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कोडोली प्रतिनिधी:-

कोडोली ता.पन्हाळा येथील जुन्या कोडोली हायस्कुल इमारतीमध्ये शिवसेनेच्या ५१ वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांच्यावतीने कोडोली परिसरातील शालेय गरजू विद्यार्थांना १५१ डझन वह्यांचे वाटप करण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमूख मा.मुरलीधर जाधव यांच्या हस्ते ह्या वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा कक्ष प्रमूख दिपक यादव, जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, कक्ष उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव, पन्हाळा तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, विभाग प्रमुख अजित पाटील, शहर प्रमुख मोहन पाटील, मंगेश दिवाण, राजू पाटील, प्रताप पाटील, प्रमोदिनी माने, दीप्ती कोळेकर, नाज सनदी, जयदीप पाटील व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!