श्री माऊली फुटवेअर ची मलकापुरात शाखा क्र.२ : १ जानेवारी रोजी उद्घाटन सोहळा
बांबवडे : श्री माऊली फुटवेअर बांबवडे या दुकानाची दुसरी शाखा उद्या १ जानेवारी २०२१ रोजी मलकापूर इथं सुरु होत आहे. यानिमित्त सत्यनारायण पूजा आणि उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या या नवीन उपक्रमास साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने लाखो शुभेच्छा. आणि या साळशीकर पोवार बंधूंचे मनापासून अभिनंदन.

शुक्रवार दि. १ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. वेदांताचार्य ह.भ.प. श्रीकृष्णानंद शास्त्रीजी यांच्या शुभ हस्ते या नवीन शाखेचे उद्घाटन होणार आहे. मलकापूर येथील पेरीड नाका, गणपती मंदिरासमोर या दुकानाचे उद्घाटन होणार आहे.

साळशी येथील विठ्ठल पोवार व नामदेव पोवार यांनी काही वर्षापूर्वी बांबवडे इथं घोडे पाटील कॉम्प्लेक्स मध्ये श्री माऊली फुटवेअर हे चप्पल चे दुकान सुरु केले. हे दोन्ही बंधू कष्टाला कधीही मागे पडले नाहीत. त्यांनी आपल्या कष्टावर विश्वास ठेवून व्यवसाय केला. आणि हळूहळू प्रगती सुरु केली. आणि त्यांच्या या कष्टाला आज सुंदर फळ लागले. आणि त्यांची दुसरी शाखा मलकापूर इथं सुरु होत आहे.

या दुकानात ब्रँडेड कंपन्यांचे चप्पल्स, शूज उपलब्ध आहेत. वूडलँड, रेड चीफ, स्पार्क्स, कँम्पस, अॅक्शन, विकेसी प्राईड, पॅरेगॉन, लुनार्स, लान्सर आदी नामांकित कंपन्यांचे चप्पल्स, स्लीपर्स, सँडल्स, फॉर्मल- स्पोर्ट – स्कूल शूज. कोल्हापुरी चप्पल, मोजरी, सॉक्स,बेल्ट्स, वॉलेट माफक दरात उपलब्ध आहेत.

मलकापूरकरांसाठी हि सुवर्णसंधी पोवार बंधूंनी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा मलकापूर व परिसरातील जनतेला निश्चित लाभ होईल. तेंव्हा ग्राहकांनी एकदा येवून खात्री करावी, तसेच या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री माऊली फुटवेअर चे विठ्ठल पोवार व नामदेव पोवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमास श्री शंकरराव ज्ञानदेव पोवार, श्री विष्णू ज्ञानदेव पोवार, श्री सुनील शंकरराव पोवार यांच्यासहित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.