साळशी गावात तीव्र पाणी टंचाई : ग्रामस्थांतून संताप
बांबवडे : साळशी (तालुका शाहुवाडी) गावात ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे. गावात दोन चार दिवस आड पाणी येत असल्याने, ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान इथं पूर्वीची जुनी पाणी योजना होती, ती गावास पाणी पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. पूर्वी गावात पाण्यासाठी मारलेल्या चार बोअर चे पाणी उन्हाळ्यामुळे गेले आहे. दरम्यान वरेवाडी इथून येणाऱ्या जिवंत झऱ्याचे पाणी सुद्धा येत नाही. दरम्यान कडवी नदीवरून आणलेल्या पाणीयोजनेत नळा फुटल्याने त्याची दुरुस्ती सुरु आहे. कडवी नदीवरून आलेल्या पाणी योजनेचे पाणी गावास अपुरे पडत आहे. आदि अनेक कारणांमुळे गावात पाणी टंचाई चे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे साळशी ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या पाणी टंचाई वर उपाय काय ,या उत्तराच्या प्रतीक्षेत गमास्थ आहेत.