” संजदादा ” एक अभूतपूर्व नेतृत्व- श्री विद्यानंद यादव
बांबवडे( दशरथ खुटाळे ) : स्व. संजयदादा म्हणजे शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्याला मिळालेले निसर्गाचे दान होते. ज्या माणसाने स्वत:साठी काहीही न करता फक्त विकासाचा ध्यास उरी बाळगला. आणि बऱ्याच अंशी पूर्ण देखील केला. तालुक्यामध्ये भगीरथाची गंगा आणणारे ते एक मोठे विकासदूत होते. आज ते आपल्यात नाहीत. यासारखी तालुक्याची दुसरी मोठी हानी नाही. आज त्यांची पुण्यतिथी. यानिमित्त त्यांना विद्यानंद यादव आणि परिवार तसेच योगीराज सरकार प्रेमी गटाच्यावतीने विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली. असे मत योगीराज गायकवाड सरकार प्रेमी गटाच्यावतीने विद्यानंद यादव यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

दादा एक तालुक्यासाठी देवदूत होते. कारण तालुक्यातील सगळ्यात निकडीची गरज होती, ती पाण्याची . यासाठी भगीरथाची गंगा शाहुवाडी आणि पन्हाळा तालुक्यात त्यांनी आणली. यासोबतच त्यांनी तालुक्यात अनेक साकव आणले. ज्यामुळे वाड्या-वस्त्यावर जनतेला ओढ्याच्या पाण्यातून मार्ग निघत होता. पावसाळ्यात महिला भगिनींच्या आरोग्याच्या समस्या उभ्या रहात होत्या त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले. अशा अनेक विकासकामांची पूर्तता संजयदादा यांनी केली.
अशा या अभूतपूर्व नेतृत्वास पुनश्च विनम्र आदरांजली आणि मानाचा मुजरा.