संभाजी हावळेंची ” चरणाई ट्रॅव्हल्स ” मुंबईकरांना एक हक्काचं बुकिंग
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील नारकर बिल्डींग मध्ये सुरु केलेला ट्रॅव्हल्स बुकिंग चा व्यवसाय आता दिवसेंदिवस उदयास येत आहे. नोकरीच्या मागे न लागता छोटा मोठा व्यवसाय करणे, हेच उत्तम समजून संभाजी हावळे या तरुणाने पान पट्टी सुरु केली, आणि आत्ता ” ट्रॅव्हल्स ” च्या सीट्स बुकिंग चा व्यवसाय त्यांनी वृद्धिंगत केला आहे.

शाहुवाडी तालुका म्हणजे डोंगराळ तालुका येथील मंडळी भाकरीच्या अर्ध्या चंद्रासाठी मुंबई पुणे इथं नोकरी करतात. आणि गावाकडे शेतीही करतात. त्यामुळे त्यांना मुंबई ते बांबवडे हा प्रवास नित्याचाच झाला आहे. त्यात एसटी महामंडळाची मुजोरी काही कमी होत नाही. त्यामुळे शाहुवाडी तालुक्यात ट्रॅव्हल्स चा व्यवसाय जोरदार सुरु आहे.

सध्या तर स्लीपर्स सुद्धा या ट्रॅव्हल्स च्या व्यावसायिकांनी सुरु केल्या आहेत. या व्यावसायिकांसाठी संभाजी सीट्स बुक करत असतात. प्रत्येक सीट मागे काही कमिशन मिळते. त्यातून संभाजींचा उदरनिर्वाह सुरु असतो. संभाजी एक प्रामाणिक मुलगा असून, ग्राहकांशी अगदी सलगीने वागत असल्याने, प्रत्येकास संभाजी स्वत:च्या कुटुंबापैकी एक असे वाटते. दादा, मामा, ताई अशा भावनिक नात्यांची गुंफण करीत संभाजी ने आपला व्यवसाय वाढवला आहे.

सध्या या व्यवसायाबरोबर संभाजी ने कोल्ड्रिंक्स आणि चहा सुद्धा सुरु केला आहे. ग्राहकांशी कसे वागावे, हे संभाजी ना चांगले जमते. त्यामुळेच कमी वयात असूनही, संभाजी एक उत्तम व्यावसायिक बनले आहेत.

त्यांच्या या चरणाई ट्रॅव्हल्स च्या व्यवसायात दिवसेंदिवस वृद्धी व्हावी, हि परमेश्वर चरणी प्रार्थना. संभाजी हावळे ना सीट्स बुकिंग साठी ९८२३९९६१००, ९७६५९७६१०० या क्रमांकावर संपर्क साधावा.