सत्कार बांबवडे च्या कर्तुत्वाचा – सरपंच श्री भगतसिंग चौगुले
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांना दैनिक पुढारी च्यावतीने आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यास्तव बांबवडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन . हा पुरस्कार ग्रामपंचायत च्यावतीने सरपंच श्री भगतसिंग चौगुले व उपसरपंच श्री सुरेश नारकर बापू यांनी स्वीकारला.
ग्रामपंचायत बांबवडे च्यावतीने गावासाठी सुमारे साडे तीन कोटी चा निधी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व संचालक मंडळ आणि ग्रामविकास आघाडी च्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून लोकप्रतिनिधींकडून मिळवला. यामध्ये विद्यमान आमदार डॉ.विनय कोरे सावकार, खासदार श्री धैर्यशील माने या लोकप्रतिनिधींचा प्रामुख्याने सहभाग आहे. यामुळे गावात विकासाची अनेक कामे साकारली.
गावातील सुमारे सर्वच गल्ल्यामध्ये काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. अनेक अशक्य रस्ते सुद्धा ग्रामस्थांसाठी चर्चेतून निर्माण करण्यात आले आहेत. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई भासायची .त्याचे सुद्धा निराकरण करण्यात आले आहे. अवघ्या दोन ते अडीच वर्षांमध्ये हि विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी मी व आमचे सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामविकास आघाडी चे नेते श्री अभयसिंग चौगुले, तानाजीराव चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते राबत आहेत. म्हणूनच हा विकास घडत आहे. असे मत लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांनी साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स शी बोलताना सांगितले.