कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप आघाडीचा झेंडा
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर तसेच नाट्यमय घडामोडीनंतर भाजप आघाडीने अखेर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत अध्यक्षपदी सौ.शौमिका अमल महाडिक( भाजप), तर उपाध्यक्ष पदी श्री.सर्जेराव पाटील , कळे (शिवसेना) यांची निवड करण्यात आली.
या निवडीवेळी भाजप आघाडीला ३७ मते तर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला २८ मते मिळालीत. या निवडीत शिवसेनेत असलेली दुफळी पुन्हा एकदा समोर आली.