सत्यजित देशमुख यांनी अगोदर आमदार व्हावे,_पत्रकार बैठकीत आमदार नाईक यांचा देशमुखांवर हल्ला
शिराळा / प्रतिनिधी :
भाजपाचे सत्यजित देशमुख यांनी खोटे बोलून शिराळा विधानसभा मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करु नये. करंजवडे चिकुर्डे रस्त्याच्या कामाचे दोन कोटीचे पत्र दिले म्हणतात, मगं दोन कोटींच्या कामाला पाच कोटी कसे मिळाले..?? याचा विचार करावा. या रस्त्याच्या कामासाठी मीच पत्र दिल्याने रस्त्याला पाच कोटी मंजूर झाले. विधानसभेच्या अधिवेशनात आमदारांच्या पत्राचा प्रथम प्राधान्याने विचार केला जातो. तर तुम्ही अगोदर आमदार व्हां मग पत्र द्या असा टोला आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत सत्यजित देशमुख यांना लगावला.
चिखली येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुचविलेल्या ४२ कोटी ८९ लाख ६२ हजार ६७२ कोटींच्या कामांना नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नाईक म्हणाले कि , सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ महादेववाडी, माणिकवाडी, काळमवाडी, वाटेगांव सुरुल, बेलदारवाडी रस्ता प्रजिमा क्र. १५९ कि.मी. ० ते २३ मध्ये सुधारणा करणे, अंदाजे रक्कम दहा कोटी, उरुण इस्लामपूर राज्य मार्ग १५२ ते लाडेगांव २ वशी, कुरळप रस्ता १३ कि.मी. सुधारणा करणे, पाच कोटी, (वाघवाडी ते कुरळप) करंजवडे चिकुर्डे रस्ता ग्रा.मा.क्र. १० कि. मी रस्ता सुधारणा करणे व लहान पूलांचे बांधकाम करणे पाच कोटी रुपये, शिंदेवाडी मांगरुळ, बलेवाडी, तडवळे ४ रस्ता करणे. (शिंदेवाडी ते मांगरुळ) दोन कोटी 25 लाख रुपये, संगमेश्वर, नायरी, झोळंबी, गुढे, पाचगणी, मेणी रस्ता सुधारणा करणे, (मणदुर धनगरवाडा येथील लांबी) एक कोटी 75 लाख रुपये, गिरजवडे, शिरशी, मानकरवाडी अंत्री खुर्द, तडवळे, बिऊर रस्ता सुधारणा करणे (भाग -शिरशी ते मानकरवाडी) एक कोटी रुपये, नांदगांव, पिशवी, बांबवडे, सरुड, सागाव, कणदूर, पुनवत, मांगरुळ रस्ता सुधारणा करणे ( ढोलेवाडी ते खवरेवाडी) दोन कोटी पन्नास लाख रुपये, पाडळीवाडी निगडी रुंदीकरणासह सुधारणा करणे व लहान पुलाचे बांधकाम करणे दोन कोटी 50 लाख रुपये, शिराळा येथे अति महत्वाच्या व्यक्तींसाठी शासकीय विश्रामगृह बांधकाम करणे दोन कोटी बाविस लाख 50 हजार रुपये, करुंगली येथील वारणा नदीकाठी पूर संरक्षक भिंतीच्या कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता सदुसष्ट लाख बारा हजार सातशे त्र्याहतर रुपये,, वाकुडे बुद्रुक, पडवळवाडी रस्ता, लहान पुलाचे बांधकाम करणे व रस्ता मजबूतीकरण करणे दोन कोटी रुपये, माणिकवाडी रेठरे धरण ऐतवडे बु. करंजवडे रस्ता, लहान पुलाचे बांधकाम करणे, (रेठरेधरण गांव) दोन कोटी रुपये, येळापूर (समतानगर) दिपकवाडी रस्ता, मेणी ओढयावर लहान पूलाचे बांधकाम करणे व रस्ता मजबुतीकरण करणे दोन कोटी 50 लाख रुपये, चिकुडे भोसलेवस्ती लहान पूल बांधणे दोन कोटी रुपये, कामेरी खांबे मळा रस्ता सुधारणा करणे एक कोटी 50 लाख रुपये अशी वरील कामे मंजूर झाली आहेत.