सभासदांच्या हितासह समाजकारण जपणारी शिवाजी पाटील गृहतारण संस्था-मा.आम.सत्यजित पाटील
बांबवडे : सभासदांच्या हितासह समाजकारण जपणारी, हि गृहतारण संस्था अल्पावधीतच प्रगतीपथावर आली आहे. सध्या सहकार टिकवणे कठीण होत असताना, ह्या संस्थेने सभासदांच्या हिताचे करापोटी जाणारे पैसे वाचवले आहेत. शिवाजी रोडे-पाटील गृहतारण सह. पतसंस्था अल्पावधीतच स्वत:च्या वास्तूत प्रवेश करेल, यात शंका नाही. असे मत माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केले.

विजयादशमी चा मुहूर्त साधून, संस्थेने नवीन वास्तूत स्थलांतर केले. त्या स्थलांतर सोहळ्याप्रसंगी मा.आम. सत्यजित पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, संस्था काढणे सोपे आहे, पण टिकवणे खूपच कठीण आहे. इथं ठेवी गोळा करण्याबरोबरच योग्य कर्जदार सुद्धा मिळवावा लागतो. त्याचबरोबर जर संस्था यशस्वीरीत्या चालवायची असेल, तर राजकारणाचे जोडे संस्थेबाहेर ठेवूनच यावे लागते. यावेळी सध्या ची कोरोना ची परिस्थिती पाहता, संस्थेने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सरूड येथील कोविड सेंटर ला सहा लाखाचा जनरेटर भेट म्हणून दिला. हे सुद्धा महत्वाचे आहे. या कोरोना काळाविषयी बोलताना श्री पाटील म्हणाले कि, विद्यमान आरोग्य सभापती हंबीरराव बापू पदावर रुजू होताक्षणी, त्यांची परीक्षा सुरु झाली, आणि कोरोना ची गाठ पडली. परंतु या परिस्थिती ला बापूंनी यशस्वीरीत्या हाताळले असून, अडचणीत जो काम करतो , तोच खरा पदाधिकारी म्हणून नावलौकिक मिळवतो, असेही माजी आम. सत्यजित पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हा परिषद चे बांधकाम व आरोग्य सभापती म्हणाले कि, समाजाला सहकाराशिवाय पर्याय नाही. सहकार रुजल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेने २०१८ पासून हे सहकाराचे शिवधनुष्य पेलले आहे, याबद्दल त्यांचे निश्चितच अभिनंदन आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन हेमंत भालेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकपर भाषणात घेतला. ते म्हणाले कि, २०१८ साली अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ह्या संस्थेचा जन्म झाला. आणि आजतागायत संस्था याशास्वीरीत्त्या कार्यरत आहे. संस्थेकडे सध्या ६.५० कोटी रुपयांच्या ठेवी उपलब्ध आहेत. तर संस्थेने ४ कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप केले आहे. संस्था संपूर्णपणे संगणकीकृत असून, गृहतारण संस्था असल्याने येथील सभासदांचे करापोटी जाणारे सुमारे २३ लाख रुपये संस्थेने वाचवले आहेत.

यावेळी शिवाजी रोडे- पाटील म्हणाले कि, हि संस्था सर्व सभासदांच्या हिताचे निर्णय घेत कार्यरत आहे. संस्था लवकरात लवकर स्वत:च्या वास्तूत जाण्यासाठी आम्ही संकल्प सोडीत आहोत.
यावेळी यशवंत सह.प्राथमिक शिक्षकांची पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले.
या कार्यक्रमास सरपंच दत्तप्रसाद पाटील, उपसरपंच भगवान नांगरे -पाटील, शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख अलका भालेकर त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ, सभासद वर्ग, कर्मचारी वृंद, तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार सर्जेराव काळे सर यांनी मानले .