राष्ट्रीय महामार्ग मलकापूर नगरपरिषदेला कशासाठी हवाय ?- बाबासाहेब पाटील
बांबवडे: मलकापूर नगरपरिषदेच्या सत्ताधारी मंडळी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मिळून मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीतून जाणारा महामार्ग नगरपरिषदेकडे वर्ग करावा,अशा आशयाची मागणी केली असून, तो त्यांना न मिळता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रहावा, अशा आशयाचे निवेदन विरोधी पक्ष नेते बाबासाहेब तातोबा पाटील व नगरसेवकांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात ते पुढे म्हणतात कि,मलकापूर नगरपरिषद ‘क’ वर्गात मोडत आहे. मुळातच इथला विकास करताना निधी कमी पडतो. राष्ट्रीय महामार्ग क्र.१८८ हा साधारणतः १ किलोमीटर अंतराचा रस्ता मलकापूर हद्दीतून जातो.कोल्हापूर ते रत्नागिरीला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. त्याची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर कडे आहे. असे असताना,व नगरपरिषदेला देखभाल दुरुस्तीचा खर्च परवडत नसताना, या महामार्गाची मागणी,सत्ताधारी मंडळींनी कशासाठी केलीय? हा मुद्दाच अनाकलनीय आहे. तेंव्हा हा महामार्ग मागण्याचे गौडबंगाल काय आहे,याचा प्रथम शासनाने विचार करावा,असाही मुद्दा श्री पाटील यांनी आपल्या निवेदनात मांडला आहे. तरी संबंधित मंडळींच्या म्हणण्यानुसार हा महामार्ग नगरपरिषदेकडे वर्ग करू नये. अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर विरोधी पक्ष नेते बाबासाहेब तातोबा पाटील, गटनेत्या सौ. माया सागर पाटील, प्रल्हाद रा. पळसे नगरसेवक, सौ. शुभांगी ना. कोकरे -देसाई नगरसेविका,सुहास सुरेश पाटील नगरसेवक, सौ.संगीता सुधाकर पाटील नगरसेविका, श्रीमती शालन वि. सोनावळे नगरसेविका, सौ. संगीता वि. कुंभार नगरसेविका, यांच्या सह्या आहेत.