सह्याद्री च्या कड्या-कपारींना ” यशवंत अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज ” चा शैक्षणिक समृद्धी चा अभिषेक
बांबवडे : सह्याद्री च्या कड्या-कपारीतील जनतेला उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, डोंगरदऱ्यातील भावी पिढी सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध व्हावी, यासाठी यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली ची स्थापना करण्यात आली आहे. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ च्या या शाखेचा आज ९ वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. माजी आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रेरणेतून हे शिक्षण संकुल डॉ. जयंत पाटील यांच्या कर्तृत्वातून उभे राहिले आहे. त्यांच्या या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा.

पन्हाळा, शाहुवाडी तालुका छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी आहे. नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध आहे. अशा भूमीला शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करण्याचा संकल्प या शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला आहे. आज ९ वा वर्धापन दिन संपन्न होताना या संस्थेने तालुक्यातील जनतेला शिक्षणाची गंगा त्यांच्या दारात कधी उभी राहिली, हे कळले सुद्धा नाही.

गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत या संस्थेने आपल्या कर्तृत्वातून नवी पिढी सक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे करताना जनतेने देखील संस्थेला आपली पसंती दर्शवित, आपले पाल्य शिक्षण संस्थेत दाखल केले आहेत.
दरम्यान प्रतीवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. आणि या पूजेला बसण्याचा मान जो विद्यार्थी वर्षाच्या सुरुवातीला प्रथम प्रवेश घेतो,त्याच्या पालकांना मिळतो. यंदा तो मान डॉ.संदीप वसंत पाटील यांना मिळाला आहे. यावेळी प्रथम प्रवेश कु.पृथ्वीराज संदीप पाटील या विद्यार्थ्याचा झाला आहे.

यासाठी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील, सचिव डॉ. जयंत प्रदीप पाटील, विश्वस्त सौ.विनिता पाटील या मंडळींनी शिक्षण कार्याला सर्वस्वी वाहून घेतले आहे. म्हणूनच शिक्षण संस्थेचा प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे.

याचबरोबर येथील प्राचार्य श्री सचिन जद सर, आणि त्यांच्या सोबत असलेले शिक्षकवृंद, आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद प्रत्येकजण स्वत:ची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत. म्हणूनच विद्यार्थी केंद्रस्थान मानून चाललेल्या या शिक्षण संस्थेचा आजचा ९ वा वर्धापन दिन यशस्वी झाल्यासारखे वाटत आहे.
पुनश्च या यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा