सह्याद्री च्या कुशीत म्हणजेच वरेवाडी त रक्तदान शिबीर संपन्न
बांबवडे : वरेवाडी ता.शाहुवाडी इथं रक्तदान शिबीर संपन्न झालं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. परंतु देशात, राज्यात चाललेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव या तरुण मंडळींना आहे. म्हणूनच त्यांनी रक्तदान शिबीर सोशल डीस्टंसिंग चं पालन करीत यशस्वीरीत्या संपन्न केलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत आहे. याची जाणीव ठेवत, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. ग्रामपंचायत वरेवाडी व गावातील तरुण मंडळांच्या सहाय्याने हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.
यावेळी ६१ रक्तदात्यांनी हे पुण्यकर्म केलं. यावेळी रामचंद्र बोरगे सर यांनी संजीवन ब्लड बँक, तसेच गावातील ग्रामस्थ व रक्तदात्यांचे आभार मानले.