सह.दुय्यम निबंधक शाहुवाडी इमारतीचे उद्या भूमिपूजन
बांबवडे :शाहुवाडी इथं सह.दुय्यम निबंधक शाहुवाडी या कार्यालयाच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन दि.२८ जुलै २०२५ रोजी दु. ४.०० वा.होणार आहे. हा भूमिपूजन सोहळा प्रामुख्याने आमदार डॉ.विनय कोरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अशी माहिती श्री विक्रम पाटील बांबवडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
सदर च्या कार्यक्रमासाठी श्री संजय शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर, बाबासाहेब वाघमोडे सह. जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर, समीर शिंगटे प्रांताधिकारी शाहुवाडी, पन्हाळा , गणेश लव्हे प्रभारी तहसीलदार शाहुवाडी, श्रीमती पूजा शेळके कार्य.अभियंता स. बां. विभाग ,श्री विजय घेरडे पोलीस निरीक्षक शाहुवाडी, उपाधीक्षक भूमिअभिलेख शाहुवाडी, कर्णसिंह गायकवाड गोकुळ संचालक, सर्जेराव पाटील पेरीडकर माजी जि.प.सदस्य, विजय बोरगे पैलवान माजी जि.प.सदस्य, सरपंच शाहुवाडी यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.