सामान्य स्तरापासून मान्यवरांकडून श्री बोरगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील पिशवी जि.प. मतदारसंघाचे माजी जि.प.सदस्य श्री विजयराव बोरगे पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सामान्य जनतेपासून मान्यवरांकडून देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कार्यालय भरून गेले होते.हि बाब निश्चितच समाजाला अनुकरणीय आहे.
श्री विजयराव बोरगे पैलवान हे व्यक्तिमत्व सुद्धा असेच समाजशील व्यक्तिमत्व आहे. त्यांनी समाजातील अनेकांना त्यांच्या वेळ प्रसंगी मदत क्केली आहे. त्यांच्या या सृजनशील स्वभावामुळे वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनेक चाहत्यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.
यामध्ये प्रामुख्याने गोकुळ चे संचालक श्री.कर्णसिंह गायकवाड, माजी उपसभापती विष्णू पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
यावेळी शाहुवाडी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार, अध्यक्ष रमेश डोंगरे, दशरथ खुटाळे, राजाराम कांबळे, नथुराम डवरी आदी पत्रकारांनी देखील श्री बोरगे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
मलकापूर नगरपरिषद चे प्रवक्ता प्रकाश केसरकर, नगराध्यक्ष अमोल केसरकर, बाजार समिती चे माजी सभापती बाबा लाड, अॅड. सुरेश पाटील, वारणा दुध संघाचे व्हा. चेअरमन एच.आर.जाधव, चरण गावाचे आदर्श सरपंच के.एन. लाड पापा यांच्यासहित सौ माधुरी संजय यादव आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस चे संस्थापक श्री शरदश्चंद्रजी पवार, खासदार निलेश लंके, शाहुवाडी पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, आदी मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.