सुरज बंडगर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या सोशल मिडिया शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी निवड
बांबवडे ; राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी, राष्ट्रीय अध्यक्ष म. श्री शरदश्चंद्र पवारसाहेब यांच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मिडिया शाहुवाडी तालुका अध्यक्षपदी बांबवडे येथील सुरज बंडगर यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन.

हि निवड उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे नेते व ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ साहेब जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, युवक प्रदेश उपाध्यक्ष नावीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड ,तसेच जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या सल्ल्याने हि नियुक्ती करण्यात आली आली आहे. अशा आशयाचे पत्र सोशल मिडिया सेल चे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध गाडवी यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.