educationalसामाजिक

स्वच्छता पुरस्कार मूल्यमापन समिती ची यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी ला पाहणी सदिच्छा भेट


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात स्वच्छता पुरस्कार अंतर्गत, स्वच्छता पुरस्कार मूल्यमापन समिती ने डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली इथं भेट दिली.


या समिती ने या शाळेतील परिसराची पाहणी केली. येथील परिसर स्वच्छता पाहिली. येथील वातावरण विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे का ? याची देखील पाहणी केली.

दरम्यान शाहुवाडी तालुक्यातून यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली या शाळेला नामांकन प्राप्त झाले आहे. यासाठी शाळेला खूप खूप शुभेच्छा. तसेच शाळा भविष्यात शैक्षणिक दर्जा उंचावणार आहेच, परंतु त्या सोबतच डिजिटल करण्याकडे सुद्धा आमचे प्रयत्न राहतील, असे संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले.


यावेळी पन्हाळा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी श्री मानकर सर, तसेच शाहुवाडी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री नंदकुमार शेळके सर यांच्या समवेत श्री दुर्गे सर, केंद्रप्रमुख पन्हाळा श्री जाधव सर, केंद्रप्रमुख राक्षी चे श्री लोहार सर, श्री पिंपळे सर, आदी मान्यवर या स्वच्छता मूल्यमापन समिती मध्ये समाविष्ट होते.


यावेळी शाळेचे प्राचार्य श्री सचिन जद सर यांनी समितीचे स्वागत केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!