“स्वाभिमानी” ची शाहुवाडी तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर
बांबवडे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नूतन कार्यकारिणी ची निवड नुकतीच संपन्न झाली. यावेळी शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी श्री सुरेश म्हाऊटकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संघटनेची अन्य कार्यकारिणी ची निवड देखील संपन्न झाली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार श्री राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक संपन्न झाली.या बैठकी साठी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, पक्ष प्रवक्ते विक्रम पाटील जैनापुरकर या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांची देखील यावेळी निवड करण्यात आली. शाहुवाडी – पन्हाळा विधानसभा प्रमुख पदी जयसिंग पाटील चरणकर,शाहुवाडी तालुका डोंगरी तालुका अध्यक्ष पदी विजय पाटील अनुस्कुरा, तसेच राजू वडाम, संघटनेच्या युवा तालुका अध्यक्ष पदी रामभाऊ लाड, मनीष तळवडेकर, संघटक पदी विजयकुमार थोरात उर्फ भैय्या,तालुका उपाध्यक्ष पदी संजय केळसकर, बाजीराव सुळेकर,यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या महिला तालुका अध्यक्षपदी नंदाताई पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. अजित साळोखे यांची शाहुवाडी प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.
बैठकीचे स्वागत श्री सुरेश म्हाऊटकर यांनी केले. यावेळी जिल्हा युवा उपाध्यक्ष पदी अवधूत जानकर, जिल्हा युवा सरचिटणीस पद्मसिंह पाटील, तानाजी हावळे, अमर पाटील, शिवाजी पाटील,सुभाष कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संतोष पाटील यांनी मानले.