शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख, व उपविभाग प्रमुख निवडी संपन्न
बांबवडे : येथील शिवसेना शाहुवाडी-पन्हाळा संपर्क कार्यालयामध्ये जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पिशवी जिल्हापरिषद मतदारसंघामध्ये उपतालुका प्रमुख म्हणून हरीष तुकाराम पाटील यांची, तर शित्तूर-वारुण जिल्हापरिषद मतदारसंघामध्ये उपतालुकाप्रमुख म्हणून दिनकर लोहार यांची निवड करण्यात आली. कडवे पंचायत समिती मतदारसंघामध्ये उपविभाग प्रमुख म्हणून नामदेव आनंदा काटकर यांची निवड करण्यात आली.
या सर्व निवडी संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी , तालुकाप्रमुख दत्ता पोवर उपस्थित होते. याचबरोबर शिवसैनिकांची उपस्थिती सुद्धा अधिक होती.