” स्वामी कलेक्शन ” प्रस्तुत होम मिनिस्टर ९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील नामांकित असलेले ” स्वामी कलेक्शन ” वस्त्र दालन च्या वतीने दिपावली धमाका ची सोडत ९ नोव्हेंबर २०२२ रोजी महादेव मंदिर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे. तसेच त्याच दिवशी ” होम मिनिस्टर ” चा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यासाठी होम मिनिस्टर फेम कोल्हापूर आकाशवाणी च्या निवेदिका पूजा रेंदाळे -सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती स्वामी कलेक्शन चे मालक अमित चौगुले बंधू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

दरम्यान दिवाळी कपडे खरेदी वर कुपन भेट जाहीर केली होती. त्याची सोडत तसेच ” होम मिनिस्टर ” कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी महादेव मंदिर इथं जाहीर करण्यात आला आहे.

स्वामी कलेक्शन प्रस्तुत होम मिनिस्टर च्या कार्यक्रमात पहिले बक्षीस मानाची ” हिरकणी पैठणी “,दुसरे बक्षीस “कांजीवरम पैठणी “,तिसरे बक्षीस ” येवला पैठणी ” ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन देखील श्री चौगुले यांनी केले आहे.