” स्वीकारा कुटुंब नियोजनाचे उपाय, लिहा प्रगतीचा नवा अध्याय “,- शाहुवाडी आरोग्य विभाग
शाहुवाडी प्रतिनिधी : ११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शाहुवाडी तालुक्यामध्ये नसबंदी शस्त्रक्रिया मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र तसेच भेट देवून गौरविण्यात आले.

आरोग्य विभागाचे या वर्षीचे घोषवाक्य ” स्वीकारा कुटुंब नियोजनाचे उपाय, लिहा प्रगतीचा नवा अध्याय “, असे आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उत्कृष्ट काम करणारे श्री अशोक चोरगे आरोग्य सेवक, उपकेंद्र उखळू, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया उत्कृष्ट काम करणारे ,श्रीमती अलका मोहिते, आरोग्यसेविका उपकेंद्र शित्तूर तर्फ मलकापूर, श्रीमती जनाबाई भितले, आशा स्वयंसेविका, उपकेंद्र भेंडवडे, तसेच एका मुलीनंतर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेला लाभार्थी सुवर्ण शिवाजी पाटील परळी यांचा अभिनंदन पत्र व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला आहे.

याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री बघेसाहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. निरंकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी श्रीमती स्नेहल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेडगे, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती बजंत्री, आरोग्य सहाय्यक श्री सुभाष यादव, श्री अर्जुन कांबळे, आरोग्य सेवक श्री प्रशांत कुंभार, क्षयरोग सुपरवायझर श्री शिलावाने, श्री झोकांडे, श्री शहाजी हांडे, प्राथमिक आरोग्य केंद्र माण येथील कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.