वारणानगर येथे ‘ वर्षा ‘ व्याख्यानमाला
कोडोली प्रतिनिधी :
वारणानगर (ता.पन्हाळा ) येथील श्री शारदा वाचन मंदिर आणि तात्यासाहेब कोरे वारणा सह.साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत ‘वर्षा व्याख्यनमाला’ आयोजित केल्याची माहिती अध्यक्षा श्रीमती शोभाताई कोरे यांनी दिली.
वारणानगर येथील शास्त्रीभवन येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होईल. एक ऑगस्ट रोजी डॉ.शिवरत्न शेटे (सोलापूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज अपरिचित पैलू’ या विषयाने व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. दोन ऑगस्ट रोजी प्रशांत पुप्पाल (पुणे) यांचे ‘पालक विद्यार्थी शिक्षक :समस्या आणि उपाय ’ तर तीन ऑगस्ट रोजी प्रा. मंजुश्री गोखले (कोल्हापूर) यांचे ‘तुकयाची आवली ’ या विषयावर व्याख्यान होईल. चार ऑगस्ट रोजी प्रदीप निफाडकर (पुणे ) यांचे ‘गझल उर्दु कडून मराठीकडे ’ तर पाच ऑगस्टला उदयजी मोरे (कोल्हापूर) यांचे ‘सह्याद्रीच्या कुशीत हवा शिवरायांचा जन्म ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सहा ऑगस्ट रोजी जगन्नाथ शिंदे (सातारा ) यांचे ‘घडवू नवा समाज’ या विषयावर तसेच सात ऑगस्टला डॉ.रोहित माधव साने (मुंबई) यांचे ‘ह्दयरोग :समज आणि गैरसमज’ व्याख्यान होईल. मंगळवारी आठ ऑगस्ट रोजी प्रा.डॉ.विनोद बाबर (कराड ) यांचे ‘या जन्मावर या जगण्यावर’ या वर सांगता होईल.