स्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर यांची उद्या दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी
बांबवडे : गोकुळ दुध संघाचे संचालक स्व. आनंदराव पाटील भेडसगांवकर सर्वसामान्यांचे तात्या यांची उद्या रविवार दि.१३ सप्टेंबर रोजी १७ वी पुण्यतिथी आहे.
यानिमित्त नेहमीच विविध कार्यक्रमांनी हि पुण्यतिथी संपन्न केली जाते. पण सद्यस्थितीत कोरोना संक्रमणाचा वाढता आलेख पाहता, हि पुण्यतिथी घरगुती स्वरुपात संपन्न होणार आहे. परंतु याच अनुषंगाने मास्क व सॅनीटायझर चे वाटप भेडसगाव इथं करण्यात येणार आहे. अशी माहिती शैक्षणिक विकास मंडळ भेडसगाव चे सचिव उदय पाटील यांनी दिली.