स्व. विष्णू तातोबा बच्चे ( पंत आण्णा ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न
कोडोली प्रतिनिधी : वारणा सह. साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. विष्णू तातोबा बच्चे ( पंत आण्णा ) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा इथं रक्तदान शिबीर संपन्न झाले.

स्व. विष्णू तातोबा बच्चे हे सहकार महर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांचे जुने सहकारी होते. बच्चे सावर्डे येथील सामाजिक आणि राजकीय भूमिकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
पंत आण्णा यांच्या निवासस्थानी कामधेनु सहकारी दुध संस्था इथं, त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच ग्रामस्थांनी त्यांना इथं अभिवादन केले.

स्व. पंत आण्णा यांचा सामाजिक कार्याचा वारसा चालवणाऱ्या युथ फौंडेशन व कामधेनु सह. दुध व्याव. संस्था बच्चे सावर्डे यांनी या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरास संजीवन ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

यावेळी वारणा दुध संघाचे व्हा. चेअरमन श्री. एच.आर. जाधव (आण्णा), जनसुराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क प्रमुख रवींद्र जाधव (सरपंच ), वारणा कारखान्याचे संचालक सुरेश पाटील (बापू ), कुंभी सह. साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, वारणा दुध संघाचे माजी संचालक बाळासाहेब खाडे, वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल, रामकृष्ण लोकरे (बापू ), संजय दळवी, दादा जाधव, विजय चौगुले, कुमार कणसे, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.