हंबीरराव ज्ञानदेव पाटील यांची भाजप च्या कार्यकारिणी सदस्य पदी निवड
बांबवडे : भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील शिवसेनेचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते हंबीरराव ज्ञानदेव पाटील यांची भारतीय जनता पार्टी च्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व च्या कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. तशा निवडीच्या आशयाचे पत्र जिल्हाध्यक्ष ग्रामीण पूर्व चे राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी त्यांना दिले आहे.
हंबीरराव पाटील आप्पा हे नूतन तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे यांचे जुने मित्र असून, शिवसेनेचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते. पांडुरंग वग्रे पदावर विराजमान होताच त्यांनी आपल्या कामकाजास सुरुवात केली असल्याचे, यातून दिसून येते.
या निवडीवेळी शाहुवाडी विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण प्रभावळकर, तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे आणि मान्यवरांची उपस्थिती होती.