हतबल शिवसैनिकाला मदतीचा हात – यशवंत पाटील
बांबवडे : एका ७२ वर्षीय शिवसैनिकाच्या कुटुंबाला, एका शिवसैनिकाने सहकार्य करून शिवसैनिकाची बांधिलकी जोपासली आहे. हि गोष्ट निश्चितच कौतुकाची आहे.
पणुंद्रे तालुका शाहुवाडी येथील बंडू ज्ञानू पवार (वय ७२ वर्षे) यांची पत्नी अगोदरच वारली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा अल्पश: आजाराने वारला.
त्यामुळे घरात कमावण्यासाठी कोणी नाही. काही तरी करून कसेबसे घर चालवणे, हि त्यांची व्यथा आहे. हे दु:ख शिवसेनेचे माजी तालुका संपर्क प्रमुख यशवंत पाटील हे एक समाजशील नेतृत्व आहे. ते नेहमीच यथाशक्ती प्रत्येकाला मदत करीत असतात. त्यांच्या कानावर हि व्यथा पडली, आणि ते त्यांच्या सहकार्यासाठी धावून गेले. सध्या श्री पवार यांच्या घरात सुनबाई आणि त्यांचा नातू व नात आहे. त्यांची नात सध्या दहावीला आहे. तर नातू तिसरीला आहे. यांचा उदरनिर्वाह सध्या कठीण झाला आहे. अशावेळी श्री यशवंत पाटील यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. त्यांनी काही किरण सामान, शैक्षणिक साहित्य, कपडे अशाप्रकारची मदत केली.
स्व. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार शिवसैनिकाला मदत करणे, हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. ते श्री पाटील यांनी पाळले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख दत्ता पोवार, शिवसैनिक नारायण सुतार, व पनुंद्रे गावातील शिवसैनिक नानासाहेब लोखंडे, राहुल लोखंडे,आणि सुभाष उकिरडे उपस्थित होते.
