हुतात्मा नानकसिंग विद्यालयाच्या वतीने पक्षीदिन संपन्न
उखळू ( मुकुंद कांबळे ) : शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक विद्यालय च्या वतीने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पक्षी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना चांदोली वन्यजीव कार्यालयाच्या वतीने जंगल सहल करण्यात आली.
यावेळी पक्षांच्या आवाजावरून हा पक्षी कोणता, असू शकतो , याची माहिती वनक्षेत्र अधिकारी श्री नलवडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच यावेळी वनखात्याचे श्री महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. रोहिणी नाईक, श्री भीमराव पाटील, जीवन देसाई ,मुकुंद कांबळे हे शाळेचे शिक्षक , विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.