बलात्काराच्या आरोपातील अक्षय घोलप ला २४एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी
शिराळा (प्रतिनिधी ) : कांदे, तालुका शिराळा येथील सहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या अक्षय महावीर घोलप (वय २० वर्षे )रा. थेरगाव,तालुका शाहुवाडी यास,इस्लामपूर येथील अतिरिक्त न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. १५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजणे च्या सुमारास मिरवणूक पाहण्यास गेलेली मुलगी अद्याप परत का आली नाही, हे पाहण्यासाठी तिची आई गेली,परंतु मिरवणूक संपूनही मुलगी परतली नसल्याने, तिने मुलीच्या वडिलांना हकीकत सांगितली. रात्री ११च्या दरम्यान मुलगी रडत परतली व तिने बलात्काराची हकीकत आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली व अक्षय घोलप यास थेरगाव इथून अटक करण्यात आली होती.