“१००/- रुपयात दिवाळी ” त्वरित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवू- गामाजी ठमके
बांबवडे प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ” १०० रुपयात दिवाळी ” या योजनेनुसार या शंभर रुपयात मिळणारे धान्य आम्ही रेशन धारकांपर्यंत त्वरित पोहचवू, असा निर्धार कोल्हापूर जिल्हा स्वस्त रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत झाला आहे, अशी माहिती संघटनेचे उप अध्यक्ष गामाजी ठमके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

महाराष्ट्र शासनाने शंभर रुपयांत रवा, मैदा, तेल, हरभरा डाळ हे धान्य ज्यांना रेशन मिळत आहे , अशा रेशन धारकांना त्वरित देण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्हा स्वस्त रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत कोल्हापूर इथं जाहीर करण्यात आला. परंतु शासनाने देखील हे धान्य रेशन दुकानदारांना वेळेत पोहोच केले, तरच लोकांपर्यंत आम्ही हे पोहचवू शकू. यासाठी शासनाने त्वरित हा पुरवठा रेशन दुकानदारांना करावा, अशी मागणी देखील या बैठकीत करण्यात आली आहे.

अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष गामाजी ठमके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.