१५ एप्रिल रोजी कोळगावात आरोग्य शिबिराचे आयोजन
मलकापूर ( प्रतिनिधी ) :
कोळगाव तालुका शाहुवाडी येथील युवा विकास फाऊंडेशनच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर 15एप्रिल रोजी आयोजित केले असल्याची माहिती, संस्थापक अध्यक्ष विकास कांबळे यांनी दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून या शिबीराचं आयोजन केलं असून, या शिबिरात 15 एप्रिल रोजी 9 ते 5 वाजेपर्यंत बुद्ध विहार कोळगाव येथे ई. सी. जी. ,रक्तदाब, मधूमेह, बी. एम. आय. किडनी ,डोळे, आदी तपासणी सह एक महिन्याचे मोफत औषध देण्यात येणार असून, या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन, विकास कांबळे यांनी केले आहे.