१६ जून ला कानसा-वारणा फौंडेशन च्यावतीने “ कोरोना योद्ध्यांचा सन्मान ” सोहळा
बांबवडे : कानसा-वारणा फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान दि. १६ जून २०२० रोजी विरळे ता.शाहुवाडी येथील ज्योतिर्लिंग मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या उपस्थितीत दु.३.३० वा. संपन्न होणार आहे. अशी माहिती विरळे-पळसवडे व फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
सध्या कोरोना विषाणू चा संक्रमण काळ सुरु आहे. या महामारी मध्ये देशासह महाराष्ट्र होरपळत आहे. अशावेळी सामान्य जनतेची काळजी घेणारा एक वर्ग समाजात जिद्दीने लढत आहे. अशा लढवय्यांना, कोरोना योद्ध्यांना त्यांच्या कामाची पोच पावती देणे, हे सामाजिक कार्य आहे. म्हणूनच अशा योद्ध्यांचा सन्मान सोहळा विरळे इथं १६ जून रोजी दु. ३.३० वा. संपन्न होत आहे.
या सत्कारमूर्तींचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री.गुरु बिराजदार तहसीलदार शाहुवाडी, श्री भालचंद्र देशमुख सहा.पोलीस निरीक्षक शाहुवाडी पोलीस ठाणे, श्री अनिल वाघमारे गटविकास अधिकारी शाहुवाडी पंचायत समिती, श्री. एच.आर. निरंकारी तालुका वैद्यकीय अधिकारी शाहुवाडी पंचायत समिती, पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडिया, वैद्यकीय कर्मचारी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक, वायरमन, विरळे-पळसवडे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर्स शित्तूर-वारुण गण (पंचायत समिती शाहुवाडी ) या मान्यवरांचा सत्कार संपन्न होणार आहे.
यावेळी इंडियन आर्मी मध्ये भरती झालेल्या सुपुत्रांचा देखील विशेष सत्कार करण्यात येणार आहे. श्री संपतराव पाटील-कॅप्टन इंडियन आर्मी, अभिषेक पाटील –इंडियन नेव्ही, आनंदा नेर्लेकर, गणेश नेर्लेकर, सौरभ शेटके-पाटील, सौरभ विद्रुक, निर्मला पाटील मंत्रालय लिपिक पदी निवड, यांचा देखील सत्कार संपन्न होणार आहे.
यावेळी सर्व सत्कारमुर्तींनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
यावेळी श्री सर्जेराव पाटील-पेरीडकर जिल्हा परिषद सदस्य, कर्णसिंह गायकवाड युवा नेते, श्री दीपक पाटील संस्थापक कानसा-वारणा फौंडेशन, सौ शारदा पाटील सरपंच –विरळे-पळसवडे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती देखील कृष्णा पाटील यांनी दिली.