सामाजिक

२६/११ च्या हल्ल्यातील शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली


बांबवडे : २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्या भूमिपुत्रांनी वीरमरण पत्करले, अशा सर्वच शहीद वीरांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने मन:पूर्वक विनम्र श्रद्धांजली.


या दहशतवादी हल्ल्यात सामान्य जनता सुद्धा बळी गेली. अशा मंडळींना देखील विनम्र अभिवादन.


सुमारे ४८ तास सुरु असलेलं , हे ऑपरेशन जाता जाता, या देशाचे अनेक शहीदांचे बलिदान घेवून गेले. या हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झाली, परंतु इरेला पडलेले आमचे लखलखते हिरे मात्र, काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या दु:खात आपण सहभागी आहोत. परंतु त्या अनुषंगाने निर्माण झालेली पोकळी आजही आपण भरून काढू शकत नाही. अशा वीरांना पुनश्च मानाचा मुजरा…

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!