शिराळा नगरपंचायतसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ६५.०४ %मतदान
शिराळा,: शिराळा नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी दुपारी दीड पर्यंत ६५.०४ टक्के मतदान झाले. प्रभाग १७ हा मतदानाच्या टक्केवारीत सर्वात पुढे होता. दुपार पर्यंत ६८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी साडे सात पासून मतदानास सुरवात झाली. सकाळी साडे सात ते साडे नऊ पर्यंत २१.४६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक प्रभाग १७ मध्ये ३६.३६ टक्के तर सर्वात कमी प्रभाग ११ मध्ये ११.३४ टक्के मतदान झाले होते.दुपारी दीड पर्यंत ६५.०४ टक्के मतदान झाले असून प्रभाग १७ मध्ये सर्वाधिक ८२.६४ टक्के तर प्रभाग ३ मध्ये सर्वात कमी ५४.४३ टक्के मतदान झाले.दुपार पर्यंत ६८३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिराळा नगर पंचायतीची ही पहिलीच निवडणूक असून येथे तिरंगी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप अशी तिरंगी लढत आहे.
सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने मतदानाचा वेग थोडा मंदावला होता.
निरीक्षक संजयसिंह चव्हाण,प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे, मुख्याधिकारी अशोक कुंभार,सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊ पाहणी केली.