सामाजिक

४१ ग्रामपंचायत साठी ७५९ उमेदवारी अर्ज दाखल


शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच ८९ उमेदवारांचे अर्ज ऑफ लाईन ने दाखल झाले आहेत.


या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत नेत्यांची झुंबड उडाली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी, कागदपत्रांची जुळवाजुळव, आणि मिटवा-मिटवी साठी प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ग्रामपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. वरिष्ठ पातळीवर काहीही झाले, तरी ग्रामपंचायत पातळीवरील तिढा सोडवताना मात्र नेत्यांची कसोटी लागते.


४१ ग्रामपंचायतींसाठी ७५४ उमेदवारांचे ७५९ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. यानंतर अर्ज माघार घेण्यासाठी ४ जानेवारी पर्यंत मुदत असल्याने खऱ्या अर्थाने ४ जानेवारी नंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे.


प्रशासनाने ४१ ग्रामपंचायती साठी ११२ मतदान केंद्रे निश्चित केले आहेत. यामध्ये १६ गावे संवेदनशील आहेत. अशी माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!