पुढारीचे पत्रकार श्री.केसरे यांच्या मातोश्रींचे दुखद निधन
बांबवडे : शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व दै.पुढारी चे पत्रकार आनंदराव केसरे यांच्या मातोश्री कमळाबाई रामचंद्र केसरे यांचे कोल्हापूर इथं अल्पश: आजाराने आज दि.१० ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वारणा कापशी इथं अंत्यविधी साठी आणण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. बापूसाहेब कांबळे सर, शाहुवाडी तालुका पत्रकार संघ, साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांच्या आईंना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्व मित्र परिवार आनंदराव केसरे आणि त्यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत.