गुन्हे विश्व

‘ बांबवडे ‘ त आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची अखेर ‘ खुटाळवाडी ‘ तआत्महत्या झालीच …


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं पोलीस ठाण्यासमोरील इमारतीवरून उडी मारून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाने अखेर स्वत:च्या राहत्या घरी जावून आत्महत्त्या केली, अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश चव्हाण वय २५ वर्षे अंदाजे , राहणार खुटाळवाडी, ता. शाहुवाडी , या युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजते. सर्वप्रथम बांबवडे येथील पोलीस ठाण्यासमोरील शेळके यांच्या इमारती वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही तरुणांनी इमारतीच्या गच्चीवर जावून, त्यास वाचविले. त्यावेळी तो युवक दारू प्राशन केला होता, असे समजते. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडून नेले, व काहीवेळानंतर त्याच्या आईच्या स्वाधीन केले. परंतु सदर च्या युवकाने पुन्हा घरी गेल्यानंतर आत्महत्या केली असल्याचे समजते.

बांबवडे तालुका शाहुवाडी इथं पोलीस ठाण्यासमोरील इमारतीवरून उडी मारून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न


ज्यावेळी हा युवक दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो,याचा अर्थ त्याला नेमके कोणते कारण आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे, याचा तपास होणे , गरजेचे आहे,अशी चर्चा बांबवडे परिसरात ऐकावयास मिळत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!