राजकीयसामाजिक

निवडणुकीच्या तोंडावर ” करणी, भानामती ” ? : वारणा रेठरे येथील प्रकार


बांबवडे प्रतिनिधी : करणी , भानामती चे प्रकार आजही समाजात प्रचलित असून, त्याचा प्रसार आजही होताना दिसत आहे. शाहुवाडी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीं च्या घराजवळ करणी सदृश एक ” उतारा ” काल मध्यरात्रीच्या दरम्यान ठेवण्यात आला आहे. हा उतारा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी आज सुरु आहे.


दरम्यान शनिवार दि. ४ जून रोजी रेठरे येथील सेवा संस्थेची निवडणूक असल्याने, ह्या प्रकाराकडे विशेष नजरेने पाहिले जात आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार रेठरे वारणा येथील माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांच्या घराजवळ हा उतारा ठेवला असल्याचे निदर्शनास आले.


या उताऱ्या मध्ये बकरा सदृश प्राण्याची प्रतिमा तयार करण्यात आली असून, त्याला लाकडी पाय केले आहेत. तसेच त्याच्या पाठीवर देखील एक लाकडाची खुटी मारली आहे. तसेच त्याच्या गळ्यात बांगड्या आहेत. तांदूळ,तीळ , हळद कुंकू अगरबत्ती आदी साहित्य आढळून आले.


दरम्यान सेवा संस्था निवडणूक जवळ असल्याने , या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा ग्रामस्थांमधून ऐकावयास मिळत आहेत. याच बरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार भयानक आहे. निवडणूक पारदर्शक पद्धतीने आणि प्रत्येकाने स्वत : च्या मतांवर ह्या निवडणुकीत विजय मिळवावा, असा प्रकार करून, आपण समाजाचे नुकसान करीत असून, समाजाला पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या खाईत आपण ढकलत आहोत. तसेच या प्रकाराकडे अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या सदस्यांनी या प्रकाराकडे जातीने लक्ष द्यावे, असे मत माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केले.


समाजाने अशा प्रकारावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे जावे, असेही अनेक नागरिकांचे मत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!