उद्रेक लघुपट चे उद्घाटन उत्साहात संपन्न
मुंबई: स्त्री जातीच्या शोकांतिका वर आधारीत उद्रेक लघुपट उत्कृष्ट व हृदयस्पर्शी आहे. या लघुपट चे उद्घाटन विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई मा ,सर्जेराव माईंगडे यांच्या हस्ते मुंबई येथे उत्साहात संपन्न झाले .
या लघुपटाचा विषय व्यसनाधिनतेवर आधारित आहे. आज समाजाला खरी अशा कलाकृतीची गरज आहे. व्यसनामुळे बरबाद होणारे मानवी जिवन व कुटुंब तसेच या दुष्टचक्रात अडकलेली स्त्री, तिचा संघर्ष व भावनिक तगमग अशा सर्वच गोष्टींचे दर्शन घडविणेस उद्रेक लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक व सर्व कलाकार यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. उच्चभ्रू जीवनाचे व्यसनामुळे झालेले नैतिक अधःपतन, स्त्री जातीची शोकांतिका अधोरेखित करणारा उद्रेक खरंच काळजाला भिडणारा आहे. असेही निर्मात्याच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी डायरेक्टर राजू सपकाळ सर, निर्माते हेमंत कुलकर्णी, प्रमुख कलाकार बाबासो कोतोलीकर आणि अनुपमा पाटील
, गीतकार के टी शिंदे , हिंदी कलाकार के के गो स्वामी उर्फ गबरू ,अमिश कुलकर्णी विलास बनसोडे ,संजय पाटील हे उपस्थित होते.
सर्वानी सिनेमा बगावा व् चांगला प्रतीसाद द्यावा,असे श्री. विलास बनसोडे यांनी सांगितले.