शाहुवाडी केसरी अभिजित भोसले
मलकापूर प्रतिनिधी
शाहुवाडी येथे आयोजित केलेल्या शाहुवाडी केसरी किताब कुस्ती स्पर्धा मधे मामासाहेब मोहळ कुस्ती केंद्र पुणेच्या अभिजित भोसले याने हर्षवर्धन थोरात गंगावेश कोल्हापूर याच्या वर एक गुणाने विजय मिळवून शाहुवाडी केसरी किताब पटकावला .तर गंगा वेश तालीम कोल्हापूरचा हर्षवर्धन थोरात उपविजेता ठरला.
पैलवान दत्ता वारकरी, पैलवान प्रकाश काळे,अमर पाटील यांनी आयोजित केलेल्या शाहुवाडी केसरी कुस्ती स्पर्धाचं उदघाटन प्रारंभी उदयोगपती बाबुराव सांगावकर यांच्या हस्ते आणि मा .जयवंतराव काटकर आदी
मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.
70ते85किलो वजन गटातील या कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या गटातून महेश पाटील, विकास पाटील, सूरज केसरे, अभिजित भोसले, हर्षवर्धन पवार, कुमार शेलार या मल्लांनी पुढील फेरीत प्रवेश केला. अखेर अंतीम लढत मामासाहेब मोहळ कुस्ती केंद्र पुणे येथे सराव करणारा ज्ञानेश्वर वस्ताद यांचा पट्टा आणि कुस्ती संघटक राहुल जाधव चिंचोली यांचा मार्गदर्शन घेणारा पैलवान अभिजित भोसले यांने सात विरुद्ध सहा गुणांनी शाहुवाडी केसरी किताब पटकावला
केसरी किताबाची चांदीची गदा आणि एकवीस हजाराचे ईनाम उद्योगपती बाबुराव सांगावकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, राष्ट्रीय पंच बाळू काळे, मुबंई पोलीस चंद्राकंत पाटील ,अजितसिंह काटकर आदिच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
दोन नंबरचे बक्षीस पैलवान हर्षवर्धन थोरात याला तर तिन नंबरचे बक्षीस शिवाजी पाटील यांना देण्यात आले . मैदान यशस्वी करण्यासाठी पैलवान दत्ता वारकरी, महाराष्ट्र चॅम्पीयन प्रकाश काळे, अमर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कुस्तीचे निवेदन सुरेश जाधव यांनी केले.
कुस्ती मैदानात नामवंत वस्ताद,मल्ल,सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरां सह कुस्ती शौकीनांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.