” आम्ही वारस सह्याद्रीचे ” जानेवारीत होणार संपन्न
बांबवडे : सह्याद्रीच्या कड्याकपारीत अनेक मौल्यवान मोती आहेत. ज्यांनी आप-आपल्या क्षेत्रात खूप उत्तुंग कार्य केले आहे. अशी मंडळी कधीही जाणून-बुजून लोकांसमोर येत नसतात. परंतु अशी मंडळी समाजाला निश्चितच प्रेरणादायी ठरतात. ज्यांच्या कर्तुत्वातून आपली नवी पिढी बरेच काही शिकू शकेल.
अशी मंडळी समाजासमोर आणण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो.
यंदाही आपण ” आम्ही वारस सह्याद्रीचे ” हा कौतुक सोहळा जानेवारीत संपन्न करणार आहोत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कौतुक सोहळा संपन्न होणार आहे. आपणही जर या उत्तुंग कर्तुत्ववानांमध्ये असाल,तर कृपया आपली माहिती आणि अर्ज कार्यालयाला सादर करावेत. आपण सगळ्याच कर्तुत्ववान मंडळींना एकाच वेळी गौरवू शकणार नाही. तरीही त्यातून मोजक्या मंडळींचा आपण सन्मान करणार आहोत. तेंव्हा कृपया गैरसमज न करता आपले अर्ज आणि माहिती आपल्या कार्यालयाकडे पोहचवा,हि विनंती.